कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधकांचा “नॅरेटिव्ह गदारोळ”, पण महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मात्र शिंदे – फडणवीसांनाच पूर्ण बहुमत!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीचे शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सह, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विशिष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात मोठा गदारोळ उडवत आहेत. छोट्या स्थानिक मुद्द्यांचा राज्य पातळीवर बबाल खडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. Maharashtra survey, however, Shinde – Fadnavis has a complete majority!!

पण या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल मात्र विरोधी पक्षांच्या पारड्यात जाण्याऐवजी तो शिंदे – फडणवीस यांच्या नेतृत्वाखायच्या शिवसेना – भाजप सरकारलाच मिळताना दिसतो आहे. झी न्यूज आणि मॅटिझ संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांच्या केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना – भाजप युतीला 288 पैकी 165 ते 185 जागा मिळतील असे दाखविले आहे, तर महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र आले तरी त्यांना 88 ते 118 एवढ्याच मर्यादित जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मनसेला 2 ते 5 आणि इतर अपक्षांना 12 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्यातल्या त्यात इंटरेस्टिंग बाब अशी, ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या पसंती क्रमावर एकनाथ शिंदे यांना 26%, तर देवेंद्र फडणवीस यांना 23 टक्के जनतेने पसंती दिली आहे. अशोक चव्हाण 9 % , उद्धव ठाकरे 7% असा पसंती क्रम आहे.

भाजप आणि शिवसेना युतीला मिळून 46 % टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. यात भाजपचा वाटा 30%, तर शिवसेनेच्या शिंदे गटाचा वाटा 16 % आहे.

महाविकास आघाडी एकत्र राहिली तरी 35 %, त्यात काँग्रेस 15%, राष्ट्रवादी काँग्रेस 11%, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9% मते मिळण्याची शक्यता आहे.

मनसेला 3 %, तर इतर आणि अपक्षांना 16 % मते मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात फार मोठी राजकीय घडामोड घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच संघटनात्मक पातळीवर फार मोठा फेरबदल करून खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदी नेमून शरद पवारांनी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 % मते मिळणे याचा अर्थ सुप्रिया सुळे यांच्यापुढे पक्षाचा परफॉर्मन्स उंचावण्याचे फार मोठे आव्हान उभे आहे. तसेच आव्हान उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यापुढेही आहे. आता हे आव्हान ते कसे पेलतात की शिंदे – फडणवीस यांच्या विरोधात कायदा सुव्यवस्थेचा विशिष्ट नॅरेटिव्ह चालवतच राहतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra survey, however, Shinde – Fadnavis has a complete majority!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात