विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेची कर्जाची थकबाकी तब्बल 435 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे बँकेने कारखान्याच्या गोडाऊनला सील ठोकले. पण पवार समर्थकांनी मात्र त्या कारवाईचा संबंध शरद पवारांच्या सभेशी जोडण्याचा डाव खेळला.Maharashtra state cooperatives bank sealed vithaal sugar factory for defaulting debt
त्याचे झाले असे :
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना शरद पवारांच्या कट्टर समर्थकांचा आहे. पवारांचे समर्थक अभिजित पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. परंतु या कारखान्यावर द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्जाची 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. बँकेने वारंवार नोटिशी देऊनही कारखान्याने ही थकबाकी भरली नाही. त्यामुळे बँकेने कायदेशीर कारवाई करत गोडाऊनला सील ठोकले.
पंढरपूरमध्ये शरद पवार निवडणूक दौऱ्यावर असताना बँकेने कारवाई केल्याचा पवार समर्थकांनी दावा केला. करमाळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा सुरू होती. या सभेत शरद पवारांचे भाषण सुरू होते. त्याचवेळी कारखान्यावर कारवाई सुरु झाली. याची माहिती मिळताच अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची सभा सोडून कारखान्याकडे धाव घेतली.
गोडाऊनमध्ये 1 लाख पोती साखर
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, कारखान्याच्या ३ गोडाऊनला द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सील केले. या गोडाऊनमध्ये जवळपास 1 लाख पोती साखर आहे. द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कारखान्यावर जवळपास 435 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. सभेत रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कारखान्यावर कारवाईची भीती व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सील झाले. कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस लावण्यात आली आहे.
आता स्वतःला गहाण ठेवण्याची अभिजीत पाटलांची भाषा
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने कर्जाची थकबाकी भरली नसल्याने गोडाऊन सील झाले. पण गोडाऊन सील केले म्हणून अभिजित पाटील यांनी नाराज व्यक्त केली. वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू, पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही. पवार साहेबांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बँक म्हणते, वेळोवेळी सूचना दिल्या
विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रशासनाने आपली बाजू मांडली आहे. बँकेची कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज कारखान्यातील संचालकांनी भरलेले नाही. त्यामुळे बँकेत कारखान्याचे असलेले खाते ‘एनपीए’मध्ये गेले आहे. बँकेने या संदर्भात कारखान्याला वेळोवेळी नोटीस दिली आहे. त्यानंतर थकबाकी भरली गेली नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाई करून गोडाऊन सील केल्याचा खुलासा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App