प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये अजितदादा पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील विशिष्ट राजकीय घडामोडींशी त्याचा संबंध लावला जात आहे. मात्र ईडी लवकरच पुरवणी आरोप पत्र सादर करणार आहे. त्यामध्ये या दोघांची नावे असू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.Maharashtra state cooperative bank fraud : ED charge sheet doesn’t incorporate names of ajit Pawar and Sunetra pawar
सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खासगीकरण आणि खरेदी घोटाळा प्रकरणात ईडीने 2021 मध्ये तब्बल 65 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ती गुरु कमोडिटीज सर्विसेस लिमिटेड या कंपनीच्या नावावर होती. त्याचबरोबर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खाजगी झाल्याबरोबर त्याची मालकी स्पार्कलिंग सॉईल या कंपनीकडे आली. या कंपन्या अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे ईडीने सादर केलेल्या आरोप पत्रामध्ये त्यांची नावे असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या आरोप पत्रामध्ये त्यांची नावे समाविष्ट नाहीत. त्यामुळे अनेकांना याविषयी संशय वाटला आहे. मात्र पुरवणी आरोपपत्रात त्यांची नावे असू शकतात, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होता. मात्र आर्थिक समस्यांमुळे तो डबघाईला आला आणि त्यानंतर त्याचे खासगीकरण झाले. स्पार्कलिंग सॉईल या कंपनीने तो ताब्यात घेऊन त्याचे खासगीकरण केले. ही कंपनी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याने सांगितले जाते. खासगीकरण झालेल्या जहजरंडेश्वर कारखान्याला ज्या बँकांनी कर्ज दिले त्या बँकांवर अजितदादांचे वर्चस्व होते. आता या सगळ्या संदर्भात आरोपपत्र दाखल झाले आहे आणि त्यामध्ये अजितदादा आणि सुमित्रा पवार यांची नावे नसल्यामुळे संशय तयार झाला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे रूपांतर खाजगी कारखान्यात करणे अशा स्वरूपाची कामे महाराष्ट्रात सुमारे 225 सहकारी साखर कारखान्यांबाबत घडली आहेत. अनेक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या राजकीय पुढार्यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांनी कवडीमोल भावात विकत घेतले. हे राजकीय पुढारी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यापैकी अनेक जण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर संचालक होते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने त्यांना शेकडो कोटी रुपयांची कर्ज दिली दिली. ती कधी फिटली नाहीत. यातून सुमारे 425 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा घोटाळा खूप गाजतो आहे पण त्याचा प्रत्यक्ष कायदेशीर परिणाम अजून दिसायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App