१०वी, १२वीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवसापासून सुरू होणार परीक्षा, वर्षा गायकवाड यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर आणि दहावीची परीक्षा 22 सष्टेंबरपासून सुरू होणार आहे. Maharashtra SSC HSC Supplementary Exam 2021 exam dates declared by Education Minister Varsha Gaikwad

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. १०वी-१२वी पुरवणी परीक्षा लेखी स्वरूपात होणार असून याचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in/ वर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसण्यासाठी 11 ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचा होता. तर लेट फी भरुन 19 ते 21 ऑगस्ट दरम्यानही अर्ज करता येणार होता.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा मंगळवार, 21 सप्टेंबर ते सोमवार, 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार, 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून लेखी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर मध्ये होणार आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेलं वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून महाविद्यालय आणि शाळांकडे देण्यात येणार वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra SSC HSC Supplementary Exam 2021 exam dates declared by Education Minister Varsha Gaikwad

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात