COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८०० पेक्षा अधिक नवीन करोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू

सध्या राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढताना दिसत आहे. दिल्लीसह, महाराष्ट्रातही दररोज आढळत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही वेगवान हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. Maharashtra reports 803 new COVID19 cases and three death reported in the last 24 hours

महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८०० पेक्षा जास्त नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत.

याशिवाय मागील २४ तासांमध्ये ६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ७९ लाख ९५ हजार २३२ करोना रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) हा ९८.१३ टक्के इतका आहे. तर राज्याचा मृत्यू दर १.८२ टक्के इतका आहे.


Aadhar-PAN : ‘या’ तारखेपर्यंत जर पॅनकार्ड आधार कार्डशी जोडले नाही, तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होणार!


देशात करोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान २३०० हून अधिक प्रकरणे वाढली आहेत. कोरनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या (शुक्रवार) सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील करोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

Maharashtra reports 803 new COVID19 cases and three death reported in the last 24 hours

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात