प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत असल्याचे ते म्हणाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.CM Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत, ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत. आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसते. पण ते यासाठी दिसते की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला.
मुंबई सारखे शहर हे पंधराव्या क्रमांकावर
एनसीआरबीच्या डेटामध्ये ते सध्याची लोकसंख्या पकडत नाही. त्यांचे म्हणणे असते की, आम्ही फक्त जनगनणेचीच लोकसंख्या पकडून, त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जाते. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपले कोणतेही शहर नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबई सारखे शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे. पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंदूर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमांकावर पाटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आकडेवारीपेक्षा वस्तुस्थिती महत्त्वाची असते
त्यामुळे तुलनेने महाराष्ट्रात जी शहरे आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर पाहिले तर एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी ही महत्त्वाची नसतेच, आकडेवारी ही मिसलिडींग असते. वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते. तरी देखील काही गोष्टी या आकडेवारीतूनच सांगाव्या लागतात. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाली, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App