महाराष्ट्रातील पोलिस भरतीला तात्पुरती स्थगिती; वयोमर्यादा वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात पोलीस भरतीची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली, पण आता त्या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे गेल्या दोन वर्षात पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या वयोमर्यादा ओलांडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वयोमर्यादा वाढवून पोलीस भरती करण्याचा सरकारचा मनसुबा दिसतो आहे. त्यामुळे सध्या जाहीर केलेल्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती देऊन वयोमर्यादा वाढवून भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. Maharashtra Police Recruitment Temporarily Suspended; Possibility of increase in age limit

पोलिस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात होणारी पोलिस भरती प्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेला आता तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली असून पुढील आठवड्यात याबाबतचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच राज्य राखीव दलातील पोलिस शिपाई भरती प्रक्रिया देखील पुढे ढकलली आहे.



 

भरती प्रक्रियेला स्थगिती

राज्यात पोलिस दलात 14 हजार 956 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या प्रक्रियेला नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होणार होती. पण आता या भरती प्रक्रियेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरतीच्या जाहिरातील स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आता पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

काय आहे कारण?

मागील तीन वर्षांमध्ये राज्यात पोलिस भरती झालेली नाही. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेक उमेदवार हे पोलिस भरतीसाठी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळावी, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये. त्यामुळे या भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात निघणा-या नवीन जाहिरातीत वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Police Recruitment Temporarily Suspended; Possibility of increase in age limit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात