देशातील इतर पोलीस विभाग महाराष्ट्र पोलिसांकडे बेंचमार्क म्हणून पाहतात, असंही फडणवीस म्हणाले. Chief Minister Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ’35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा – 2025′ समारोप समारंभ पार पडला. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. Chief Minister Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे येथे यशस्वीपणे पार पडल्याचा आनंद आहे. दरवर्षी अशा स्पर्धा विविध ठिकाणी आयोजित होतात, ज्यातून पोलीस खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते. या स्पर्धेत एकूण 13 संघ सहभागी झाले असून, जवळपास 2323 पुरुष आणि 606 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
ऍथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हॉकी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, जलतरण यांसारख्या 18 क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश होता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Chief Minister Fadnavis
2023 आणि 2024च्या तुलनेत या वर्षी खेळाडूंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून, त्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या क्रमांक 1चे स्थान मिळवून दिले आहे. देशातील इतर पोलीस विभाग महाराष्ट्र पोलिसांकडे बेंचमार्क म्हणून पाहतात, हीच त्यांची खरी कामगिरी आहे. ही कामगिरी अधिक गतिशील व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पोलिसांनी राष्ट्रीय खेळांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. खेळामुळे संघभावना निर्माण होऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे पोलीस दलातही ‘मिशन ऑलम्पिक’ सुरू करण्यात यावे. 2036 मध्ये भारतात होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत पोलीस दलातील खेळाडूंचा समावेश भारतीय संघात असावा यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करुयात, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App