Maharashtra Municipal Corporation : द फोकस एक्सप्लेनर: महानगरपालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, 29 मनपा, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

Maharashtra Municipal Corporation

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Municipal Corporation राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.Maharashtra Municipal Corporation

खाली पाहा निवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी दाखल – 23 ते 30 डिसेंबर
उमेदवार अर्जांची छाननी – 31 डिसेंबर
उमेदवारी मागे घेण्याची मुदत – 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी- 16 जानेवारी 2026



नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

‘जातवैधता पडताळणी’बाबत

राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.

मतदान केंद्र आणि ईव्हीएम

महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. 15,00,000/-

‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – रु. 13,00,000/-

‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. 11,00,000/-

‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व 19)- रु. 09,00,000/-

जागा व आरक्षित जागा

· महानगरपालिकांची संख्या- 29
· एकूण प्रभाग-893
· एकूण जागा- 2,869
· महिलांसाठी जागा- 1,442
· अनुसूचित जातींसाठी जागा- 341
· अनुसूचित जमातींसाठी जागा- 77
· नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 759

मतदार व मतदान केंद्र

· पुरुष मतदार- 1,81,93,666
· महिला मतदार- 1,66,79,755
· इतर मतदार- 4,596
· एकूण मतदार- 3,48,78,017
· एकूण मतदान केंद्र- 39,147

राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी राजकीय पक्षांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठका 14 ऑक्टोबर 2025, 01 डिसेंबर 2025 आणि 12 डिसेंबर 2025 रोजी पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बहुसदस्यीय पद्धत, विविध न्यायालयांचे आदेश, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था, ईव्हीएमसाठीच्या स्ट्राँग रूमची निगराणी इत्यादींबाबत बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करावयाच्या ‘जोडपत्र- 1’ आणि ‘जोडपत्र-2’ बाबत अधिक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्य प्रचारकांची (स्टार कॅम्पेनर) संख्या 20 वरून 40 करण्यात आली आहे.

प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम ‘27अअ’ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) अन्वये महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध असतात. त्यामुळे 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मतदानाची वेळ संपत असल्याने 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल. त्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 नंतर जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नाही.

मनुष्यबळाची व्यवस्था

महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सुमारे 290 निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुमारे 870 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे 1 लाख 96 हजार 605 इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत; तसेच त्यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.

‘मताधिकार’ मोबाईल ॲप

महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या ॲपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहितीदेखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून ॲपप्रमाणे ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकच असेल; परंतु याशिवाय शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी- कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल.

महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.

6 महिन्यांत कास्ट व्हॅलिडिटी सादर करावी लागणार

या निवडणुकांसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशपत्र सादर करता येणार आहेत. ज्यांना राखीव जागांवर निवडणूक लढवायची आहे, त्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवड झालेला उमेदवार 6 महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकला नाही, तर त्याची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल. या निवडणुकांसाठी एकूण मतदार 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 आहेत. यांपैकी पुरुष मतदार 1 कोटी 81 लाख 93 हजार 666 इतके आहेत. तर महिला मतदार 1 कोटी 66 लाख 19 हजार 755 तर इतर मतदार हे 4 हजार 590 आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एकूण 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

कोणकोणत्या महापालिकांची निवडणूक होणार?
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
भिवंडी
मीरा-भाईंदर
उल्हासनगर
पनवेल
पुणे
पिंपरी-चिंचवड
कोल्हापूर
सांगली
सोलापूर
इचलकरंजी
नाशिक
अहिल्यानगर
धुळे
जळगाव
मालेगाव
छत्रपती संभाजीनगर
लातूर
नांदेड-वाघाडा
परभणी
जालना
नागपूर
अकोला
अमरावती
चंद्रपूर

निवडणुका 5 ते 7 वर्षांपासून प्रलंबित

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका मागील 5 ते 7 वर्षांपासून किंवा त्याहून अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.

29 महापालिकांत 2869 जागा

आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह 29 महापालिकांतील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात 1442 महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 341, एसटीच्या 77 व नागरिकांचा मागास प्रवर्गातील 759 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार

या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे ते म्हणाले.

Maharashtra Municipal Corporation Elections Schedule 29 Manapa Voting Results Photos Videos Report

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात