वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यू वाढत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनाही यातून सुटण्याचा मार्ग दिसेनासा झाला आहे. हतबल झालेली ही मंडळी आता एकमेकावर आरोपाच्या तोफा डागत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशीच आरोपाची तोफ डागली. maharashtra lockdown 2021 corona virus devendra fadnavis to sanjay gaikwad
“मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला,” असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसंच बेड्सचा तुटवडा आहे. यावरुन राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपा नेते ठाकरे – पवार सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आहेत. वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद निर्माण करणारं हे वक्तव्य केलं आहे.
“भाजपाच्या लोकांचं नीच राजकारण महाराष्ट्र पाहत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील…आज हा कोरोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही. कोरोना फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला होत नाही. तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ आहे का ,” असं गायकवाड म्हणाले आहेत.
“भाजपच्या १०५ आमदारांनादेखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे हे विसरु नये. त्यांचे २० खासदारदेखील महाराष्ट्राने निवडून दिले आहेत. अशावेळी केंद्रांकडून राज्यातील लसनिर्मिती कंपन्याना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडेसिविर देऊ नका. ऑक्सिजनची मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.
“मोदी सरकार, फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री असते तर नरेंद्र मोदींनी काय केलं असतं? चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केलं असतं? राज्यातील मंत्री जीव तोडून नियोजन करत असताना मदत करायची सोडून राजकारण करत आहेत, खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय?,” असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.
maharashtra lockdown 2021 corona virus devendra fadnavis to sanjay gaikwad
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App