Maharashtra Local Body : राज्यातील 288 नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष; मोदींनी केले अभिनंदन

Maharashtra Local Body

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Local Body  महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूकी महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. त्यामुळे तेथील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर सारासार विचार करता महायुतीने ही निवडणूक आपल्या खिशात घातली आहे.Maharashtra Local Body

राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 207 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना 53 व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागा जिंकत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे 28, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) 7 व शिवसेना ठाकरे गटाचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत. तर इतर समर्थक पक्ष व अन्य यांची संख्या 37 होते.Maharashtra Local Body



पक्षनिहाय आकडेवारी

महायुती – 207

भाजप 117
शिवसेना ( शिंदे) 53
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 37
महाविकास आघाडी – 44

काँग्रेस 28
शिवसेना (ठाकरे गट) 9
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 7

महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या जनतेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मानले आभार

मी सकारात्मक प्रचार केला- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 213 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. सगळ्या सभांमध्ये मी विकासावर मत मागितली. तसेच आम्ही काय विकास करणार आहोत याची ब्ल्यु प्रिंट मांडली आणि याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी आमच्या विकास कामांवर दिलेली पावती आहे. आज देशात मोदींच्या नेतृत्वात भाजपबद्दल जी काही सकारात्मकता आहे याचा फायदा आम्हाला झालेला आहे.

Maharashtra Local Body Election Results 2025 BJP Mahayuti Win PM Modi Congratulates Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात