Devendra Fadnavis सर्वाधिक संख्या अन् गुंतवणुकीसह महाराष्ट्र ही स्टार्टअपची जननी – मुख्यमंत्री फडणवीस

devendra Fadnavis

बंगळुरु किंवा हैदराबाद नाही तर महाराष्ट्र स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया आहे, असंही सांगितलं. devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी COEP तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान, पुणे येथे ‘डिपेक्स 2025 : अ स्टेट लेवल एक्झिबिशन-कम-कॉम्पिटीशन ऑफ वर्किंग मॉडेल्स’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या चार दशकांपासून डिपेक्स प्लॅटफॉर्म तरुणाईला आपले ज्ञान, कौशल्य, नाविन्यता, या सर्व गोष्टी एकत्रितपणे मांडण्याची संधी देत आहे. डिपेक्स प्रदर्शनातून अनेक कल्पना एका चांगल्या प्रयोगात परिवर्तित झाल्या. तुमचे इमॅजिनेशन जिथपर्यंत पोहोचते त्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते, अशा प्रकारची संधी आज तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिली आहे. नव्याने सुरु झालेले स्टार्टअप दोन ते तीन वर्षात युनिकॉर्न झालेले पाहायला मिळत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र स्टार्टअपची जननी आहे. स्टार्टअप्सची सर्वाधिक संख्या आणि सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. बंगळुरु किंवा हैदराबाद नाही तर महाराष्ट्र स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया आहे. टियर 2, 3 शहरांमधून आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंगमधील युवक स्टार्टअप उभे करत आहेत. यामध्येही टेक्नॉलॉजी स्टार्टअप अतिशय महत्त्वाचे आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत 2047 ची संकल्पना मांडली, तेव्हा त्याच्या मुळाशी देशातली युवाशक्ती, इनोव्हेटर्स होते. युवाशक्ती भारताला विकासाकडे नेऊ शकते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्डचा नारा दिला. यातले सर्वात महत्त्वाचे क्षेत्र डिफेन्सचे असून एकेकाळी 100% आयात करणारा भारत आज ₹30-35 हजार कोटींची निर्यात करत आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी इथेनॉल धोरण, यामुळे पेट्रोल-डिझेलची कमी होत असलेली आयात, ऊर्जा सुरक्षितता, शेतीसाठी सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा, शून्य कार्बन उत्सर्जन हे विषयदेखील मांडले. तसेच ‘नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ’ असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती, या क्षेत्रातील नवे प्रयोग, नवे तंत्रज्ञान, स्टार्टअप, उद्योग व रोजगारनिर्मिती होत असल्याचे सांगितले. 2047 च्या विकसित भारताचा आपण विचार करतो तेव्हा विकासाचा अर्थ रस्ते, इमारती बांधणे नाही तर शाश्वत विकास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, डिपेक्समध्ये सहभागी झालेल्या इनोव्हेटर्सच्या कमर्शियल आणि स्केलेबल प्रकल्पाला हातभार लावण्याकरता महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पाठीशी उभे राहील, असे आश्वस्त केले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री पंकज भोयर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव डॉ. विरेंद्र सोलंकी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra is the motherland of startups with the highest number and investment said Chief Minister Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात