विशेष प्रतिनिधी
मुंबई: Chief Minister Fadnavis सामान्य माणूसही एक क्रिएटर झालेला आहे. त्याने सर्जनशीलतेच्या जोरावर स्वतःची एक स्वतंत्र स्पेस निर्माण केली आहे.क्रिएटर्स इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनण्याकडे महाराष्ट्र अग्रेसर आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.Chief Minister Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (MFSCDC), मुंबई यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला.Chief Minister Fadnavis
₹92,000 कोटींहून अवघ्या 100 दिवसांत ₹1 लाख कोटींपर्यंत वाढलेल्या वेव्ह्स इंडेक्सच्या माध्यमातून क्रिएटर्स इकॉनॉमीच्या वृद्धीचा वेग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केला. ते म्हणाले, आज सामान्य माणूसही एक क्रिएटर झालेला आहे. त्याने सर्जनशीलतेच्या जोरावर स्वतःची एक स्वतंत्र स्पेस निर्माण केली आहे. ही क्रिएटिव्ह स्पेस आता उत्पादन स्त्रोतात रूपांतरित होऊ लागली असून त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमी ही आजची गरज बनली आहे.
वेगाने वाढणाऱ्या क्रिएटर्स इकॉनॉमी क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण व प्रमाणित मानव संसाधन अत्यावश्यक आहे. यासाठी कौशल्य प्रशिक्षणासोबत प्रमाणपत्र (Certification) ही तितकीच महत्त्वाची बाब आहे. अनेक लोकांकडे कौशल्य असूनही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना संधी मिळत नाहीत. या सामंजस्य करारामुळे प्रशिक्षण आणि सर्टिफिकेशन दोन्ही एकत्रितपणे मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एफटीआयआय आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील या सहकार्याचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले, एफटीआयआय ही देशाला आणि जगाला दर्जेदार कलाकार देणारी संस्था आहे, तर महाराष्ट्राची फिल्मसिटी ही व्यावसायिक सिनेमाचा आधार आहे. या दोन भक्कम इकोसिस्टीम्स आता एकत्र येऊन तिसरी, अधिक सशक्त आणि क्रिएटिव्ह इकोसिस्टीम तयार होईल. यामार्फत येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App