जानेवारीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची रुग्ण आढळून येण्याची शक्यता ; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

जानेवारी महिन्यात आढळून येणारे हे रुग्ण केवळ मोठ्या शहरांतील नसून लहान शहरांतीलही असतील, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. Maharashtra is likely to see a large number of omecron patients in January; Shocking claim of experts


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने देशभरात हाहाकार मजवला आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.अशातच ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्राच टेंशन वाढणार असल्याचा धक्कादायक दावा तज्ज्ञांनी केला आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जानेवारी महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची प्रकरणे आढळून येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.तसेच जानेवारी महिन्यात आढळून येणारे हे रुग्ण केवळ मोठ्या शहरांतील नसून लहान शहरांतीलही असतील, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.



ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची ७३ रुग्णांची नोंद झाली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या चार नवीन संसर्गांपैकी २ रुग्ण उस्मानाबादमधील,१ मुंबईतील आणि एक बुलढाण्यातील आहे.यापैकी ३ रुग्णांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधितांमध्ये १६ ते ६७ वयोगटातील एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

या सर्वांचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचं निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान प्रशासनातर्फे कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावं,एकाच ठिकाणी गर्दी करू नये, प्रत्येकाने मास्क वापरावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.तसेच सोबतच मास्क न घालणाऱ्यांना दंड आकारण्यात येत आहे.

Maharashtra is likely to see a large number of omecron patients in January; Shocking claim of experts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात