धक्कादायक, भयावह…; नागपूरात दोन कोविड पेशंट शेअर करताहेत एक बेड, कारण पेशंटचा ओघ वाढतोय, वैद्यकीय अधीक्षकांचा गंभीर इशारा


वृत्तसंस्था

नागपूर – महाराष्ट्रात नागपूरच्या सरकारी रूग्णालयात कोविडच्या दोन पेशंटला एक बेड शेअर करावा लागतोय, असा विडिओ व्हायरल झाला. त्यामागचे धक्कादायक सत्य नागपूरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी या विडिओचे सत्य नाकारले नाही. उलट त्याच्या वास्तवामागची दाहकता स्पष्ट केली. Maharashtra: In a viral video, more than one COVID patient seen sharing a bed in Nagpur’s GMC Hospital

महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या भयावह स्थितीची कल्पना यावरून यावी. होय, नागपूरच्या सरकारी मेडिकल क़ॉलेजच्या रूग्णालयात दोन कोविड पेशंटना एक बेड शेअर करावा लागतोय. कारण पेशंटची संख्या खूप वाढते आहे. आणि नागपूरच्या शहर भागातून तसेच ग्रामीण भागातूनही कोविड पेशंट इथे येत आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.यापुढची धक्कादायक बाब त्यांनी सांगितली, ती म्हणजे नागपूरमध्ये लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधूनही कोविड पेशंट येत आहेत. त्यामुळे नागपूर मेड़िकल कॉलेजच्या रूग्णालयातली पेशंटची संख्या प्रचंड वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

जनतेने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे. वैद्यकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर पेशंटवर उपचार करण्यात कमी पडतील, हा इशाराही त्यांनी दिला आहे.

Maharashtra: In a viral video, more than one COVID patient seen sharing a bed in Nagpur’s GMC Hospital

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात