गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे मोठे विधान
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : yogesh-kadam महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑपरेशन सिंदूर आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्राला अशांत करण्याचे सतत प्रयत्न झाले आहेत.yogesh-kadam
मॉक ड्रिल असो किंवा अंतर्गत सुरक्षा, आम्ही सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहोत, असे कदम यांनी म्हटले आहे. तसेच, गेल्या दोन ते अडीच वर्षांत, अंतर्गत राजकारण, शहरी नक्षलवादी, प्रत्यक्ष नक्षलवादी किंवा हिंदू-मुस्लिम मुद्द्यांच्या नावाखाली जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राला अशांत करण्याचे प्रयत्न सतत होत आहेत. ज्यांनी असा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना रोखण्यासाठी आम्ही कठोर कारवाई केली. असंही त्यांनी सांगितले.
याचबरोबर ते पुढे म्हणाले, गेल्या पाच-सहा महिन्यांत आम्ही नक्षलवाद्यांवर जास्तीत जास्त कारवाई केली आहे, बांगलादेशी घुसखोरांवरही कारवाई करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात ४५० हून अधिक बांगलादेशींना पकडण्यात आले आहे. आमच्या सरकारने गेल्या दोन ते अडीच वर्षांत जबरदस्त कारवाई केली आहे. केंद्राकडून मिळालेल्या सूचनांनुसार राज्य सरकारने काम केले आहे.
याशिवाय, गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, जेव्हा ऑपरेशन सिंदूर घडले तेव्हा आम्ही भारत-पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. मग ते भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय किंवा डिजिटल संवाद असो. आम्ही सर्व गोष्टींवर सतत लक्ष ठेवून होतो. गेल्या दीड महिन्यात सायबर गुन्हेगारीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार होतो. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आले. तसेच काही यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली.
ते पुढे म्हणाले की, ज्यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानची स्तुती केली किंवा ‘पाकिस्तान जिंदाबाद’ सारखे नारे दिले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App