विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी व शनिवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत गत दोन दिवस अतिवृष्टी झाली, तर मुंबईत अवघ्या तीन तासांत २०० मिमी पावसाने हाहाकार माजवला. कोकण विभागात गत चार दिवसांपासून आणि विदर्भातही गत २४ तासांपासून मुसळधार पाऊस झाला.Maharashtra
यामुळे उद्भवलेल्या विविध दुर्घटनांमध्ये विदर्भात ७ जणांचा, नांदेडमधील तिघांचा तर मुंबईतील २ असा एकूण १२ जणांचा बळी गेला. चालू महिन्याच्या राज्यात अतिवृष्टीचा…पहिल्या आठवड्यापासूनच दडी मारलेल्या पावसाने राज्यात जवळपास सर्व विभागांमध्ये दमदार वापसी केली. शुक्रवारी व शनिवारी दोन्ही दिवस मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी, धाराशिव, लातूर व हिंगोली या सर्व जिल्हयात अतिवृष्टी झाली.Maharashtra
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गेवराई व बनगावसह काही गावांत काही तासात धुव्वाधार बरसलेल्या पावसामुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहर परिसरात शुक्रवारी सकाळी ८.३० जे शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांत पिसादेवी ७१.२५ मिमी, चौका १००.७५, पिसादेवी व वरूड काझी मंडळात ७२.५० मिमी एवढा जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पळशी गावातील नदीला पूर आला. यामध्ये २ पूल वाहून गेले. यासोबतच १० घरांत पाणी घुसले.
नारेगावातील नाल्याला पूर आल्याने गोदामात व शेकडो घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक कार पाण्याखाली बुडाल्या होत्या. बीडमधील १७ मंडळांत, धाराशिवच्या १२ मंडळात, तर परभणीतील ५ अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात ४ मंडळांत अतिवृष्टी झाली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत कोसळून आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ९.३० मिमी पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे कळमनुरी ते नांदापूर मार्ग सुमारे चार ते पाच तास बंद होता. दरम्यान, अवघ्या तीन तासांच्या मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा ‘तुंबई’ बनवले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ४ वाजेदरम्यान शहरासह उपनगरांमध्ये २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. मुंबईच्या विक्रोळीत पार्कसाईट परिसरात घरावर दरड कोसळल्याने पिता-पुत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, दोघे जखमी झाले. विदर्भात जोरदार पाऊस सुरू असून वेगवेगळ्या घटनांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसाने शेतीचे मोठे नुकसान
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, काढणीला आलेले मूग, उडीद, हळद, ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे. शेतातील सुपीक माती व खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
राज्यामध्ये आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज
राज्यात रविवार १७ ते २३ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. विशेषत: मराठवाडा,मध्य महाराष्ट्रासह कोकणात रविवार व सोमवार तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज आहे. १७ व १८ ऑगस्ट रोजी नाशिक,जळगावसह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App