Satara Gazetteer : ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार; मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातील बैठकीत आरक्षणाचा आढावा

Satara Gazetteer

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Satara Gazetteer मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. उपोषण सुरू असताना हैदराबादसह सातारा गॅझेट देखील लागू करण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतु, अद्याप सातारा गॅझेट लागू झाले नसल्याने मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. याच संदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.Satara Gazetteer

उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आजच्या बैठकीत सातारा गॅझेटियरवर प्रामुख्याने चर्चा झाली आहे. तसेच हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण विषयावर आढावा घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅझेट लागू करण्यास अडचणी येत असल्याचे म्हटले जात आहे.Satara Gazetteer



आजच्या झालेल्या बैठकीनंतर, फक्त इंटरप्रिटेशनचा भाग असल्याने या संदर्भात देखील लवकरच निर्णय होणार असून समज-गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. सुरुवातीला नगरपालिका, मग महापालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारला मोठे निर्णय घेता आले नसल्याचे समजते.

आता जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर सातारा गॅझेटियर लागू केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आणखी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी देखील या निमित्ताने पूर्ण होणार असल्याचे दिसते.

Satara Gazetteer to be Implemented for Maratha Reservation After ZP Polls

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात