Maharashtra Government : शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

Maharashtra Government

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Government  शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना भरणे म्हणाले, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषि विभागामार्फत आयोजन केले जाते, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.Maharashtra Government

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, 2012 नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, विद्यमान 1 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.Maharashtra Government

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, या निर्णयामुळे आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव घेता येईल तसेच प्रगत देशांतील शेतीपद्धतींचा अभ्यास करून त्या आपल्या शेतीत राबवण्याची प्रेरणा मिळेल. तसेच ही योजना 2004-05 पासून कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे.Maharashtra Government



शेतकऱ्यांना विदेशात जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील यशस्वी मॉडेल्स आणि बाजारपेठीय पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जांची छाननी जिल्हा कृषी अधिकारी, राज्यस्तरीय समित्या आणि कृषी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना कोणत्या देशांमध्ये जाता येणार?

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या महत्त्वाकांक्षी योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या योजनेत आता प्रति शेतकरी अनुदानाची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून 2 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. कृषी विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, या बदलामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड यांसारख्या देशांमधील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पिक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया आणि निर्यातक्षम शेतीपद्धती यांचा अधिक प्रभावीपणे अभ्यास करणे शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा होईल?

या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खाली गोष्टींच्या बाबतीत फायदा होऊ शकतो.

अत्याधुनिक यांत्रिकी शेती
ठिबक सिंचन आणि जलव्यवस्थापन
जैविक शेती
कृषी उत्पादन प्रक्रिया व मूल्यवर्धन
कृषी निर्यात आणि विपणन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव मिळणार
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत
अधिक उत्पादन आणि दर्जेदार पिकांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होणार आहेत.

Maharashtra Government Hikes Subsidy for Farmers’ Foreign Study Tours to ₹2 Lakh; Aim to Adopt Global Best Practices

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात