विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदावरून अजितदादांनी त्यांची खेचली पण त्याचवेळी अजितदादांना परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी देखील त्याची परतफेड केली.
महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला अजितदादांनी आणि नंतर एकनाथ शिंदेंनी प्रस्तावना केली. या प्रस्तावने दरम्यानच एकनाथ शिंदे यांनी गेल्या अधिवेशन पासून ते आत्तापर्यंत एकच बदल झाला आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मी यांच्यात खुर्चीची अदलाबदल झाली. अजितदादांची खुर्ची मात्र कायम राहिली, असे वक्तव्य केले. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा तोच धागा पकडून अजितदादांनी तुम्हाला तुमची खुर्ची टिकवता आली नाही, तर मी काय करू??, असा टोला हाणला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना टोला हाणून घेतला. अजितदादांची खुर्ची परमनंट आहे पण आमची रोटेटिंग चेअर आहे असे फडणवीस म्हणाले त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहात हशा उसळला.
– विरोधकांचे ९ पानी पत्र
सरकारने अधिवेशनापूर्वी घेतलेल्या चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. पण त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध मुद्द्यांवर आधारित तब्बल ९ पानी पत्र सरकारला पाठवले. यात धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यापासून ते महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांपर्यंत सगळ्या प्रश्नांचा उल्लेख केला. आत्तापर्यंत कुठल्याही विरोधी पक्षाने सरकारला पाठविलेले हे सगळ्यात मोठे पत्र ठरले असल्याचे अजितदादा म्हणाले. विरोधकांकडे आमदार कमी असल्यामुळे त्यांनी जास्त पानांचे पत्र पाठवले असावे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी हाणला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App