Ajit Pawar : मंत्रिमंडळात फेरबदलावर अजित पवार म्हणाले- हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार; कोकाटे-सूरज चव्हाणवरही केले भाष्य

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री यांचे असतात. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे? त्याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय होईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.Ajit Pawar

अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्या संदर्भात अजित पवार यांनी सांगितले की, त्यांना सध्या पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनीही अजून माझी भेट घेतलेली नाही. त्यांना भेटून त्यांची देखील बाजू ऐकणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याच बरोबर विधिमंडळात रम्मी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात सोमवारी कोकाटे आणि मुख्यमंत्र्यांसोबत आपण चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.Ajit Pawar



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाकडून झालेला गोळीबार आणि सूरज चव्हाण प्रकरणावर देखील अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले. एखाद्याच्या नतेवाईकाने गोळी चालवली असेल तर त्या नातेवाइकाचा दोष असतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून त्यानंतरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सूरज चव्हाण यांच्या संदर्भातला निर्णय देखील आपण लवकरच घेणार असल्याचे ते म्हणाले.

विजय गाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट

या संदर्भात अजित पवार यांनी सांगितले की, छावा संघटनेचे विजय गाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सर्व तपशीलवार माहिती माझ्यासमोर मांडली. त्यांच्या तक्रारी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत, मी तात्काळ लातूरच्या पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, छावा संघटनेच्या इतर मागण्या बाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल असा विश्वास मी त्यांना दिला आहे.

Ajit Pawar: CM Decides Cabinet Reshuffle; Action on Kokate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात