प्रतिनिधी
मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवान हालचाली सुरू असताना शिंदे गट आणि भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना फोन गेल्याच्या चर्चा आहेत. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी तशा बातम्या दिल्या आहेत मात्र, शिंदे गटाकडून एकाही आमदाराला मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात कळविण्यात आलेले नाही. केवळ “मंगळवारी सकाळपर्यंत मुंबईत पोहोचा”, एवढाच निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही बातमी सुद्धा पक्की नसून सूत्रांच्याच आधाराने आहे. Maharashtra cabinet expansion; shinde faction kept suspense
शिंदे गटाने आपल्या समर्थक आमदारांना सकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्याची सूचना केली आहे. लवकरच अधिवेशन होणार असल्याने त्यादृष्टीने रणनीती आखण्यासाठी आपल्याला एकत्रित जमायचे आहे, एवढेच त्यांना सांगितले आहे. या आमदारांनी मंत्रिमंडळ समावेशाबाबत विचारले असता, स्वतः एकनाथ शिंदे उद्या सकाळपर्यंत निर्णय कळवतील, माध्यमातील बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे थेट उत्तर त्यांना देण्यात आल्याचे समजते.
Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?
गुप्तता अपरिहार्य
युतीच्या समीकरणानुसार शिंदे गटाच्या वाट्याला जास्तीत जास्त १६ मंत्रिपदे येणार आहेत. त्यात ७ किंवा ८ कॅबिनेट आणि उर्वरित राज्य मंत्रीपदे असतील. त्यामुळे इच्छुक जास्त आणि मंत्री पदे कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी उर्वरित आमदारांचे समाधान कसे करावे?, असा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. आयत्या वेळी नावे जाहीर करून, उर्वरित आमदारांना पुढच्या टप्प्यात समावेश करू, असे आश्वासन दिले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
5 नावे पक्की
दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, संदिपान भुमरे आणि शंभूराजे देसाई अशी 5 नावे पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात पक्की झाली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री किंवा मंगळवारी सकाळी त्यांना फोन करून कळवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App