जाणून घ्या, देवेंद्र फडणवीसांनी दिलेली सविस्तर माहिती आणि कोणती आहेत ती पंचामृतं?
विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. पाच ध्येयांवर आधारित असणारा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशी असल्याचे दिसून आले. Maharashtra Budget What are the five goals on which the budget was based and how much was allocated for them
अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच धेयांवर आधारित असून, पंचामृत असा आहे, असं सांगत फडणवीसांनी ते पंचामृत कोणते हे सांगितले व त्याअंर्गत कशाप्रकारे निधी देण्यात आला याचीही सविस्तरपणे माहिती दिली.
Maharashtra Budget : तरूणांच्या रोजगार निर्मितीसाठी भरघोस निधी अन् शिक्षणसेवकांच्या मानधनासह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ
विभागांसाठी तरतूद –
– कृषी विभाग : 3339 कोटी रुपये
– मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये
– सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये
– फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
– अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
– पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये
– जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
– पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये
– मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये
……….
प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये
………
– महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये
– सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये
– इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये
– दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये
– आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये
– अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये
– गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये
– कामगार विभाग : 156 कोटी रुपये
………….
द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये
……..
– सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये
– ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये
– नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये
– नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये
– परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये
– सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये
……………..
तृतीय अमृत एकूण : 53,058 कोटी रुपये
– उद्योग विभाग : 934 कोटी
– वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी
– कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
– शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये
– उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये
– वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये
– क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये
– पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये
चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये
LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2023
LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2023
– वन विभाग : 2294 कोटी रुपये
– पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये
– उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये
………..
पंचम अमृत एकूण : 13,437 कोटी रुपये
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App