फडणवीस + शिंदे सरकारच्या बजेट मधून अजितदादांनी २ कोटी 53 लाख लाडक्या बहिणींना नेमके काय दिले??

Maharashtra Budget session 2025

विशेष प्रतिनिधी

मुंबई : फडणवीस + शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पामधून अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना नेमके काय दिले याची उत्सुकता सर्वांना होती त्याबद्दल आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अजितदादांनी सविस्तर मांडणी केली. लाडकी बहीण योजनेत सध्या 1500 रुपये मिळत असून तो हफ्ता 2100 रुपये केला जाणार का? याची सर्व लाभार्थी महिलांना उत्सुकता होती. दरम्यान अजित पवार यांनी योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत  सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे.  त्यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे,” अशी माहिती अजित पवारांन दिली. यावेळी एका आमदाराने त्यांना मधेच रोखून 2100 रुपये झाले ना? अशी विचारणा केली. त्यावर अजित पवारांनी जरा बजेट होऊ द्या, सांगत दम ठेवा असा सल्ला दिला.

या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता 50 कोटी 55 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे अशी माहिती दिली. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त उच्च आणि  व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो असं त्यांनी सांगितलं.

अजित पवारांनी एकूण 1 तास 9 मिनिटं भाषण केलं. त्यात त्यांनी उद्योगावर 27, शेतीवर 9, घरे, वीज यावर 4, शिक्षणावर 3 आणि आरोग्यावर दीड मिनिटं भाष्य केले.

Maharashtra Budget session 2025 Ajit pawar speech in vidhan bhavan

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात