प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळात आज एक “विक्रम” केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांना घोषणाबाजीत भाषण करू दिले नाही. ते फक्त काही सेकंदाचे भाषण करून निघून गेले. लिखित स्वरूपाचे भाषण पटलावर ठेवले गेले आणि आज तर त्याच्यावर कडी करत मुख्यमंत्र्यांच्या उत्तराविना राज्यपालांच्या आभाराचा ठराव देखील विधिमंडळात चर्चेविना मंजूर करण्यात आला.Maharashtra Budget session 2022: Governor not allowed to address in sloganeering; The resolution of thanks was also passed without the reply of the Chief Minister
शेतकऱ्यांच्या वीज कापणीच्या मुद्द्यावरून विरोधी भाजपने प्रचंड घोषणाबाजी करत सदनामध्ये गोंधळ घातला. या गोंधळामुळे मुख्यमंत्री सदनात फिरकले नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. पण त्यामुळेच आधी राज्यपालांना महाविकास आघाडीच्या आमदारांच्या घोषणाबाजीमुळे अभिभाषण करता आले नाही आणि आता मुख्यमंत्र्यांना सदनात उपस्थित राहून चर्चेला उत्तर देता आले नाही. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांचे न झालेले अभिभाषण आणि मुख्यमंत्र्यांनी न दिलेले उत्तर असा “विक्रम” घडला आहे…!!
महाराष्ट्र भजन मंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत झाल्याने विरोधी पक्षाने सभागृहात गदारोळ केला आहे. हा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात अनुपस्थित राहिल्यानेही विरोधक आक्रमक झाले होते. अशातच आता विधानसभेच्या कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
सदनाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार मुंबईच्या विकासकांना सुट देतय, दारू विक्री करणाऱ्यांना सुट देत आहे. मात्र शेतकऱ्यांना का वीज बिलातून सूट देत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सोलापूर जिल्ह्यातील सूरज या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. ही गंभीर बाब आम्ही सभागृहात उपस्थित केली. संवेदनशीलता दाखवत सरकारने वीज कापनी बंद करावी, अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारला केली आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ”शेतकरी आमचे वीज कनेक्शन कापू नका, असे सांगूनही वीज कापली जात आहे. उपमुख्यमंत्र्यानी सभागृहात दोनदा आश्वासन देऊनही वीज कापली जात आहे. उपमुख्यमंत्र्याच्या शब्दाला उर्जामंत्री किंमत देत नाहीत. आज शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदारही हाच प्रश्न मांडत असताना सरकारकडून त्यांची मुस्कट दाबी करण्यात आली.
फडणवीस म्हणाले की, ”हे शेतकरी विरोधी सरकार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांवर वीज बिल न भरल्याने होणारी कारवाई थांबत नाही. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडले जात नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू, असं ते म्हणाले, तसेच फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खचून जाऊन आत्महत्या करू नका, असे आवाहन देखील केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App