
प्रतिनिधी
मुंबई : आसाम मधील भीमाशंकर आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या मुद्द्यावरून विरोधकांनी खऱ्या ज्योतिर्लिंगाचा वाद सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने जी भूमिका घेतली होती, की महाराष्ट्रातील भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग मधले आहे. या भीमाशंकरच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात शिंदे – फडणवीस सरकारने विशेष तरतूद केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे यांच्या विकास आणि संवर्धनावर देखील भर देत मोठ्या तरतुदी केल्या आहेत.Maharashtra Budget : large amount allocation for 5 jyotriligas including bhimashankar and other pilgrimage
आसाम मध्ये तिथल्या सरकारने त्यांच्या राज्यातील भीमाशंकरचा उल्लेख सरकारी जाहिरातीत ज्योतिर्लिंग असा केला होता. त्यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी खऱ्या ज्योतिर्लिंगासंदर्भात वाद घातला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग खरे असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्यावर केवळ शाब्दिक भर देता महाराष्ट्रातील भीमाशंकरच्या विकास आणि संवर्धनासाठी आर्थिक वजन ठेवले आहे. विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी याच मुद्द्यावर भर दिला.
त्याचवेळी फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी २० कोटींची तरतूद केली, तर कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान करत श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना जाहीर करण्यात आली.
कोणत्या तीर्थस्थळांसाठी काय तरतूद?
- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास – ५०० कोटी रुपये
- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी – ३०० कोटी रुपये
- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण – ५० कोटी रुपये
- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी २५ कोटी रुपये
- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी २५ कोटी रुपये
- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर ६ कोटी रुपये
- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) २५ कोटी रुपये
- विविध स्मारकांसाठी तरतूद
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
- भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
- स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
- विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
- स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक
- विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके
- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी
Maharashtra Budget : large amount allocation for 5 jyotriligas including bhimashankar and other pilgrimage
महत्वाच्या बातम्या
- शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला
- ‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!
- Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरघोस निधी जाहीर
- ‘’पाकिस्तानने जर मोदींच्या राजवटीत भारताला चिथावलं तर…’’ अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा