महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचाही मोठ्याप्रमाणावर विकास केला जाणार
प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येय्यांवर आधारित असून, यामध्ये राज्यभरात विविध ठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी भरघोस निधी जाहीर करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्राचे वैभव असलेल्या विविध धार्मिक क्षेत्रांचाही मोठ्याप्रमाणावर विकास केला जाणार असून, त्यासाठीही निधीची तरतूद अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आली आहे. Maharashtra Budget In the first budget of the Shinde Fadnavis government huge funds were also announced for the memorials of great men
कोणत्या स्मारकांसाठी किती निधी जाहीर? –
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : ३४९ कोटी रुपये दिले आता आणखी ७४१ कोटी रुपये देणार
– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी दिला जाणार
– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटी रुपये
– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारकासाठी २५ कोटी रुपये
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी रुपये
– अमरावती येथील स्व. रा. सू. गवई स्मारकासाठी २५ कोटी रुपये
– नांदेडमधील विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारकासाठी निधी जाहीर
– सांगलीमधील कोकरुड येथील स्व. शिवाजीराव देशमुख स्मारकासाठी २० कोटी रुपये जाहीर
तुकोबारायांची ओवी सांगत देवेंद्र फडणवीसांकडून अमृतकाळातील राज्याचा पहिला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प सादर
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास –
– श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकासासाठी ५०० कोटी रुपये
– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये
– श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
– श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी २५ कोटी रुपये
– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
– प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
– गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी २५ कोटी रुपये
– नागपूर श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी सहा कोटी रुपये
– पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ २५ कोटी रुपये
LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2023
LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2023
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे –
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक
– विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके
– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी जाहीर करण्या आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App