विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज द टाइम्स ग्रुपच्या ‘ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, इतिहास आपली दिशा बदलण्याआधी कधीही निमंत्रण पाठवत नाही, आणि आपण सध्या अशाच एका निर्णायक वळणावर उभे आहोत. विसावे शतक हे औद्योगिक कारखाने, भौतिक भांडवल आणि उत्पादनशक्तीने परिभाषित झाले. मात्र, एकविसाव्या शतकात परिवर्तन होणार की नाही हा प्रश्नच उरलेला नसून, त्या परिवर्तनाचे नेतृत्व कोण करणार हा खरा प्रश्न आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत टप्प्या-टप्प्याने होणाऱ्या सुधारणांपासून व्यापक आणि संरचनात्मक परिवर्तनाकडे वाटचाल करत आहे.
पायाभूत सुविधा, महामार्ग, बंदरे आणि विमानतळांचा मोठ्या प्रमाणावर विकास व विस्तार करून महाराष्ट्राने जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यात मोठे योगदान दिले आहे. तसेच दावोसमधून महाराष्ट्राने ₹30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली असून, याव्यतिरिक्त ₹10 लाख कोटींच्या गुंतवणुकीवर प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळ देशाच्या जागतिक व्यापाराला नवी गती देतील. तसेच, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील अनेक जिल्ह्यांना जागतिक बाजारपेठांशी जोडत आहे. तसेच मेट्रो आणि नव्या टाऊनशिप्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात जागतिक दर्जाची शहरे उभारली जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App