वाटेल ते बोला आणि विधिमंडळ अधिवेशन गाजवा; म्याऊं म्याऊं, खोके बोके, निर्लज्जपणा आणि बाप!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : वाटेल ते बोला आणि विधिमंडळ अधिवेशन गाजवा, असाच पायंडा गेल्या काही दिवसांमध्ये पडला आहे. त्यामुळेच विधिमंडळ अधिवेशनात इतर महत्त्वाचे कामकाज लक्षात राहण्यापेक्षा लक्षात राहतात ते सदनात आणि सदना बाहेर वापरले गेलेले वेगळे शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी. Maharashtra assembly session; MLAS utterance and verbal exchange make it futile

ठाकरे – पवार सरकारच्या काळातले अखेरचे अधिवेशन गाजले ते म्याऊं म्याऊं या शब्दांनी. भाजपचे आमदार नितेश राणे हे त्यावेळेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करत असताना म्याऊं म्याऊं असे ओरडले. शिवसेनेचा वाघ हा मांजर झाला असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यावेळच्या विधानसभेत नेमके कामकाज काय झाले हे कोणाच्या लक्षात नाही, पण नितेश राणे यांचे म्याऊं म्याऊं ओरडणे मात्र लक्षात राहिले.

त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडवून ठाकरे – पवार सरकार गेले आणि शिंदे – फडणवीस सरकार आले. शिंदे फडणवीस सरकारच्या काळातले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन खोके बोके या शब्दांनी गाजले. 50 खोके एकदम ओके या घोषणा आधीच्या सत्ताधारी आणि आत्ताच्या विरोधकांनी दिल्या. ताट वाटी चलो गुवाहाटी या घोषणाही दिल्या. पण सगळ्यात नारेबाजी गाजली, ती खोके बोके हीच!!



 

आता कोरोना नंतरचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असताना हे अधिवेशन गाजते आहे, ते निर्लज्ज या शब्दाने. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून आम्हाला बोलू द्या. आम्हाला परवानगी नाकारण्याचा निर्लज्जपणा तुम्ही करू नका, असे उद्गार काढले आणि जयंत पाटील अधिवेशनात काळासाठी निलंबित झाले. त्यांच्या या उद्गारांविषयी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली. पण जयंत पाटलांचे निलंबन टळू शकले नाही.

जयंत पाटलांनी जो निर्लज्ज शब्द उच्चारला, त्या शब्दामुळे त्यांचे निलंबन झाले. पण हाच निर्लज्ज शब्द अजितदादांनी आज 26 डिसेंबर 2022 रोजी वेगळ्या संदर्भात विधानसभेत उच्चारला आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा भूखंड घोटाळा बाहेर काढताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून वक्तव्य केले. अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत गेल्या सहा महिन्यांपासून काही ना काही तरी घडतच आहे. कधी ते महिला खासदारांविषयी अपमानास्पद उद्गार काढतात. कधी ते जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिणार का, म्हणून विचारतात आणि आता तर त्यांचा मोठा भूखंड घोटाळा बाहेर आला आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. अब्दुल सत्तारांचा हा सगळा निर्लज्जपणा आहे. तुमच्या 115 आमदारांमुळे ते मंत्री झाले. हे तुम्ही सहन करता म्हणून ते मंत्री राहतात. तुम्ही ठरवले तर त्यांचा राजीनामा घेऊ शकता, असे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

एकूण निर्लज्जपणा या शब्दाभोवती विधिमंडळाचे हे हिवाळी अधिवेशन गाजत आहे. त्याचबरोबर त्यात एक शब्द जोडला गेला आहे, तो म्हणजे बाप. सीमा प्रश्नावर महाराष्ट्र विधानसभेत ठराव आणण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावताना बाप हा शब्द वापरला आहे. भास्करराव जाधव म्हणतात, कर्नाटक सरकार पुढे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झुकतील. पण कोणाच्या बापाची महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना झुकवण्याची हिंमत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना सुनावले.

Maharashtra assembly session; MLAS utterance and verbal exchange make it futile

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात