महाराष्ट्रातली जनता आज विकासाचा अजेंडा चालविणार, की ठाकरे, पवारांची घराणेशाही टिकविणार??

नाशिक : महाराष्ट्रातली जनता आज विकासाचा अजेंडा चालविणार, की ठाकरे आणि पवारांची घराणेशाही टिकविणार??, असा कळीचा सवाल राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या आजच्या मतदानाच्या दिवशी समोर आला आहे. आज 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत आहे.

राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने विकासाचा अजेंडा चालविला. त्यांनी आपल्या प्रचारातल्या सगळ्या भाषणांचा भर विकासाच्या मुद्यावर ठेवला होता. अगदी अपवादात्मक परिस्थितीत त्यांनी घराणेशाही चालविणाऱ्या ठाकरे, पवारांवर टीका केली. पण ती प्रामुख्याने प्रत्युत्तरे देण्याच्या स्वरूपात ठेवली. ठाकरे पवारांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सौम्य भाषेत प्रत्युत्तर दिले.

– स्थानिक नेत्यांना भाजपचे “बळ”

आपण स्वतःच ठाकरे आणि पवारांविरुद्ध बोलण्याच्या ऐवजी फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या आपल्या स्थानिक नेत्यांना ठाकरे आणि पवारांच्या विरोधात बोलण्यासाठी “बळ” दिले. त्यामुळेच आशिष शेलार, अमित साटम, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे या नेत्यांनी ठाकरे आणि पवार यांना अंगावर घेतले. आणि ते सगळे ठाकरे आणि पवारांच्या अंगावर गेले. त्यातून भाजपने दुहेरी राजकारण साधले. देवेंद्र फडणवीसांनी विकासाचा अजेंडा चालविला, तर दुसऱ्या‌ आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी ठाकरे आणि पवारांचा अजेंडा मोडून काढला.

– ठाकरे आणि पवारांचे अस्तित्व टिकेल??

दुसरीकडे ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र झाले. ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाणे या दोनच शहरांवर लक्ष केंद्रित केले, तर पवार काका – पुतण्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांवर लक्ष दिले. कारण ठाकरे आणि पवारांचे राजकीय प्राण या चार शहरांमध्येच गुंतून राहिले. त्यातही पवार काकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पवार पुतण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे शरणागती पत्करली. त्यापलीकडे 25 महापालिकांच्या निवडणुकांकडे ठाकरे आणि पवारांचे लक्षच नव्हते. त्यामुळे मराठी मध्ये म्हणणे कितीही ठाकरे आणि पवार ब्रँडचा बँड वाजवला तरी ते संपूर्ण महाराष्ट्रातून संकुचित झाले आणि आपापल्या शहरांपुरते उरले हेच राजकीय सत्य प्रस्थापित झाले.

– भगवे गार्ड्स आणि “दादागिरीशी” सामना

या राजकीय पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मतदानात शहरांमधले मतदार विकासाचा अजेंडा चालविणार, की ठाकरे आणि पवारांची घराणेशाही त्यांचा प्रभाव उरलेल्या शहरांमध्ये टिकवून धरणार??, हा सवाल समोर आला. या सवालाचे उत्तर शहरांमधला मतदार आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये बंद करेल. त्यावेळी मुंबईत त्या ठाकरे बंधूंच्या भगव्या गार्डशी सामना करावा लागेल, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये “दादागिरीला” तोंड द्यावे लागेल. भाजपचे नेते भगव्या गार्डचा आणि दादागिरीचा मुकाबला कसे करतात, हे आज पाहणे महत्त्वाचे ठरले.

Mahanagar Palika Election Today Voting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात