विशेष प्रतिनिधी
जालना : Mahadev Jankar महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेते शरद पवारांना लक्ष्य करतात. त्यात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवारांवर टीका करताना दिसून येतात. परंतु, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे.Mahadev Jankar
क्रांती दिनाचे औचित्य साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ओबीसी मंडल यात्रा सुरू केली असून यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ओबीसी मंडल यात्रा सध्या जालन्यात दाखल झाली असून यावेळी महादेव जानकर देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.Mahadev Jankar
महादेव जानकर म्हणाले, ओबीसीच्या हिताचे प्रश्न घेऊन ही यात्रा जात असल्यामुळे मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः हजर झालो आहे. ओबीसीच्या हिताचा निर्णय घ्यायचे काम शरद पवार यांनी केले आहे. आंब्याच्या झाडाला माणसे दगड मारतात, ज्याला फळ नसते त्याला कोणी दगड मारत नाही, असे म्हणत महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून जानकर यांनी ठाकरेंची साथ देत महायुती व भाजपवर टीका केली होती. तसेच ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला देखील ते उपस्थित होते. आता आगामी स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध- प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने राज्यभरात ‘मंडल यात्रा’ आयोजित करण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधत नागपूर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवून तिचा शुभारंभ केला. मात्र, या मंडल यात्रेवर महायुती आणि भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या यात्रेवर टीका करत गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी म्हटले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात आला होता. ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जात आहे आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादीचा मुख्य आधार आहे. त्यामुळे ओबीसी वर्ग श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये, हाच या मंडल यात्रेमागचा राजकीय हेतू आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App