विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Mahadev Jankar राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज बुलढाणा येथे बोलताना ‘देशात मतचोरी होत आहे’ या विरोधकांच्या आरोपाला पाठिंबा दिला. या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यास शेतकऱ्यांनी संपावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.Mahadev Jankar
महादेव जानकर यांनी यावेळी मतचोरी आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. देशात आणि राज्यात मतचोरी होत असल्याचा विरोधकांचा आरोप सत्य आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मला स्वतःला मतचोरीचा अनुभव आलेला आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही या गंभीर विषयावर गप्प का आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मतचोरी आणि बोगस मतदारांच्या बाबतीत राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आपले पूर्ण सहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Mahadev Jankar
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
कृषिप्रधान देशात जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील, तर सर्व शेतकऱ्यांनी संपावर जावे, असे थेट आवाहन जानकर यांनी केले. सध्या राज्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक आहेत. त्याचप्रमाणे, अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलेली मदत तुटपुंजी असल्याबद्दल शेतकरी आणि विरोधकांनी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर जानकर यांनी केलेली ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.
पंकजा मुंडेंबाबत स्पष्टीकरण
यावेळी महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली. पंकजा मुंडे या जरी माझ्या बहिणी असल्या तरी त्यांचा पक्ष आणि माझा पक्ष वेगळा आहे. आमचे नाते राजकारणाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण जानकर यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App