विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सच्या 205 व्या जयंती साठी मुंबईच्या धारावीत शेतकरी कामगार पक्षाने काल महाभंडारा आयोजित केला होता. या महाभंडाराच्या कार्यक्रमात शेकडो धारावीवासीयांनी भाग घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रातले नेते जयंत पाटील, काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र जेडीएसचे नेते प्रभाकर नारकर आदी नेते या महाभंडाऱ्याला उपस्थित होते.MahaBhandara for Dharavi locals to mark Karl Marx’s 205th birth anniversary
ज्या कार्ल मार्क्सने कामगार क्रांतीची मशाल पेटवून निम्मे जग कम्युनिस्ट करण्यासाठी प्रेरणा दिली, त्याच मार्क्सने धर्म ही अफूची गोळी आहे. त्यामुळे धर्मत्याग करा, असा संदेश दिला होता. पण त्याचा धर्मत्यागाचा संदेश महा भंडाऱ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून देण्याचा विचित्र प्रकार शेतकरी कामगार पक्षाने धारावीत अवलंबला.
पक्षाची कामगार नेता सम्या कोरडे हिने या महामंडळाच्या आयोजन केले आणि त्याला पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. पण त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेल्या आणि काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेल्या डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी देखील हजेरी लावली. यावेळी नचिकेत कुलकर्णी या मार्क्सवादी विचारवंताने मार्क्स विचार आजही कसे समायोजित आहेत, याचे विवेचन केले. त्यांना अर्शद शेख या 19 वर्षाच्या धारावीतल्या युवकाने अनुमोदन दिले.
कार्ल मार्क्स जयंतीचा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला कामगारांना हक्काची जाणीव करून द्यायची होती. त्यामुळे लोक जमवण्यासाठी आम्ही स्नेहभोजन ठेवले होते. पण धारावीतले सांस्कृतिक वातावरण लक्षात घेऊन आम्ही त्याला महाभंडारा असे नाव दिले, असे सम्या कोरडे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांना सांगितले. पुढच्या वर्षी कार्ल मार्क्सच्या जयंती साठी राज्यभरात महाभंडारे आयोजित केले जातील, असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App