Maha Corona Crisis : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती ओढावली आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दर्शवत आहे. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 66,358 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच काळात कोरोनामुळे 895 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.5 टक्के आहे. सध्या 42,64,936 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत, 30,146 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. नवीन रुग्णांमुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 6,72,434 वर पोहोचली आहे. Maha Corona Crisis Total 895 deaths and 66,358 new corona cases in 24 Hours in Maharashtra
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती ओढावली आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दर्शवत आहे. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 66,358 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच काळात कोरोनामुळे 895 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.5 टक्के आहे. सध्या 42,64,936 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत, 30,146 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. नवीन रुग्णांमुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 6,72,434 वर पोहोचली आहे.
Maharashtra reports 66,358 new cases, 895 deaths and 67,752 discharges today; case tally rises to 44,100,85 pic.twitter.com/oimeU1IsZS — ANI (@ANI) April 27, 2021
Maharashtra reports 66,358 new cases, 895 deaths and 67,752 discharges today; case tally rises to 44,100,85 pic.twitter.com/oimeU1IsZS
— ANI (@ANI) April 27, 2021
मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4014 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी कोरोनामुळे 59 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, गेल्या 24 तासांत 8,240 जण बरेही झाले आहेत. या काळात 30,428 चाचण्या घेण्यात आल्या. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर 68 दिवसांवर आला आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या 66,045 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईत कोरोना टेस्ट होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे की, राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी 40 टक्के चाचण्या अँटीजेनद्वारे केल्या जात आहेत. 26 एप्रिल रोजी 28,000 अँटिजन चाचण्या घेण्यात आल्या. केवळ 16,800 आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. जर इतक्या कमी प्रमाणात आरटीपीसीआर तपासण्या झाल्या असतील तर मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल स्पष्ट माहिती मिळणे अवघड होईल, असेही त्यांनी नमूद केले.
Maha Corona Crisis Total 895 deaths and 66,358 new corona cases in 24 Hours in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App