वृत्तसंस्था
इंदौर : मध्य प्रदेशच्या आलीराजपूर येथे शनिवारी दुपारी शिव मंदिरातील नंदी पाणी पित असल्याची अफवा गावभर पसरली. त्यानंतर, भाविकांनी दूध घेऊन मंदिरात धाव घेतली. विशेष म्हणजे या नंदी महादेवाला पाणी आणि दूध पाजण्यासाठी मंदिरात मोठी रांग लावली. नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी-दूध पाजण्यासाठी पुढे जात होते. Madhya Pradesh: Rumors that Nandi is drinking water in Shiva temple, crowd of devotees carrying milk
शहरातील पंचेश्वर महादेव मंदिर, सर्वेश्वर महादेव मंदिर आणि शहरातील इतरही शिव मंदिरात भक्तानी पाणी व दूध घेऊन गर्दी केली आहे. नंदीच्या मुखाजवळ चमच्यात भरलेल पाणी हळूहळूकमी होत असून हा परमेश्वराचा चमत्कारच असल्याचं मत काही भाविकांनी व्यक्त केलं आहे.
या अफवेनंतर खंडवा, इंदौर, मंदसौर, वास, खरगोन, शहडोलसह आजुबाजूच्या शहरात भाविकांनी शिव मंदिरात जाऊन नंदीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App