प्रतिनिधी
मुंबई : अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 19 वर्षे वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली. तिच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतल्यानंतर 24 तासाच्या आत ही बेपत्ता युवती साताऱ्यामध्ये सापडली असल्याची माहिती आहे. Love Jihad victim young girl from amravati found in satara
अमरावतीतील लव्ह जिहाद प्रकरणांवरून खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना धारेवर धरल्यानंतर पोलिसांनी जोरात हालचाली केल्या परिणामी ही मुलगी साताऱ्यात सापडली आहे आरोपीचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे या मुलीला अमरावतीतून साताऱ्यात पाठवून नंतर गायब करण्याचे कारस्थान होते.
पोलिसांनी बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान या युवतीस ताब्यात घेतले असून ती सुरक्षित असल्याची माहिती राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या 8 दिवसातील अमरावतीमध्ये लव्ह जिहादची 5 प्रकरणे आढळली आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व जण चिंतीत होते. या प्रकरणाची दखल घेत काल, बुधवारी रात्रभर सीपी डॉ. आरती सिंह या राजापेठ पोलीस स्टेशनला होत्या. यावेळी डीसीपी साळी, मकानदार, पीआय ठाकरे उपस्थित होते. पीआय ठाकरे यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्या चौकशीतून जो काही सुगावा लागला होता, त्यानुसार पुढील तपास सुरू केला.
अमरावती येथून सोहेल शहा युवकाने एका या तरूणीला फसवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप असलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर संबंधित तरूणी ही साताऱ्यातून गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. या तपासात तरूणीला ताब्यात घेण्यात आले असून तिला अमरावती पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान या तरूणीला साताऱ्याला पाठवून नंतर गायब करायचे असे त्यांचे कारस्थान होते.
मात्र त्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळले आणि मुलीचा शोध घेतला. या प्रकरणात अमरावती पोलिसांना सातारा पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी मदत केली. ही मुलगी आता साताऱ्यात सुरक्षित आहे. पोलिसांकडून मुलीचा शोध आणि तिची सुरक्षित वापसी, या दोन बाबींना प्राथमिकता देण्यात आली होती. अखेर पोलिसांचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि मुलगी साताऱ्यात सापडली. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App