प्रतिनिधी
जळगाव : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नुकसान सहन करावे लागू शकते, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.Loss of Mahavikas Aghadi possible due to Vanchit and Bharat Rashtra Samiti
जळगाव मध्ये राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींच्या शिबिरात या पार्श्वभूमीवर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातल्या राजकीय परिस्थिती विषयी भाष्य केले. वंचित बहुजन आघाडी मुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आधीच्या निवडणुकांमध्ये नुकसान सहन करावे लागले होते, हा इतिहास आहे. चंद्रशेखर राव यांना भारत राष्ट्र समिती पक्षाचे काम करण्याचा अधिकार आहे. तो त्यांना लोकशाहीने दिला आहे. पण भाजप समोर सर्व एकत्र लढत असताना राजकारणात कोणी पायात पाय घालण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला बी टीम असे म्हणतात. तसे कोणी करत असेल तर ते पहावे लागेल, अशा शब्दांत शरद पवारांनी चंद्रशेखर राव यांच्या राजकीय प्रयत्नांवर भाष्य केले.
के. चंद्रशेखर राव हे त्यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात वाढवताना प्रामुख्याने त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षाच्या नेत्यांना प्रवेश देत आहेत. भाजपचा एखाद दुसऱ्या नेत्याचा अपवाद वगळता भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेले बाकी सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेच आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी चंद्रशेखर राव यांच्यावर शरसंधान साधले आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडी बद्दल प्रतिकूल मत व्यक्त करून त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युती असली तरी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत स्थान मिळेल का नाही?, याविषयी संशय तयार केला आहे.
सावरकरांचा धडा कर्नाटकात तिथल्या काँग्रेस सरकारने वगळला. या मुद्द्यावर भाष्य करताना शरद पवारांनी धडा वगळल्याने कुठेही सामाजिक तेढ उत्पन्न होऊ नये अशी काळजी सरकारने घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. मात्र त्याच वेळी सावरकरांचा धडा वगळण्याचे आश्वासन काँग्रेसने आधीच दिले होते. जनतेने काँग्रेसला बहुमत दिले आहे. त्यामुळे तो निर्णय जनतेने आधी स्वीकारला आहे, असा दावाही पवारांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App