विशेष प्रतिनिधी
नाशिक:नाशिक जिल्ह्यात आज दुपारपासून पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन लावण्यात येणार आहे. कोरोना बधितांची संख्या कमी होत आहे. मात्र पुन्हा वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 23 मे च्या रात्री 12 वाजे पर्यंत कडक लॉक डाऊन लागू केले आहे. Lockdown in Nashik district from today
त्यामुळे नागरिकांना केवळ वैद्यकीय कारण असेल तरच बाहेर पडता येणार आहे. किराणा दुकाने दुपारी 12 वाजे पर्यंत सुरू असली तरी घरपोच किराणा द्यावा लागणार आहे. भाजीपाला दुपारी फक्त 12 वाजेपर्यंत मिळेल.
कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि औद्योगिक कारखाने बंद असणार आहेत. केवळ ज्या कारखान्यात कामगार राहण्याची व्यवस्था आहे किंवा दोन किलो मीटर क्षेत्रात त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था शक्य आहेत असेच कारखाने सुरू ठेवता येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App