विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP Appoints स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुखांची निवड केली असून, बीड जिल्ह्यातही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस यांची, तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धस आणि मुंडे यांच्यात उफाळून आलेला वाद सर्वांनी पाहिला होता, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे काम करण्यासाठी या दोन्ही नेत्यांना एकत्रितपणे जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. BJP Appoints
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप ॲक्शन मोडवर आले असून, पक्षाकडून तत्काळ जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातही भाजपने मजबूत मोर्चेबांधणी करत ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबई या सर्व ठिकाणी मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App