लिव्ह इन प्रेयसीची जंगलात नेऊन हत्या, आरोपी रिझवानला साथीदार अर्षदसह अटक

प्रतिनिधी

मुंबई : लव्ह जिहाद मधून आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात लिव्ह इन रिलेशनशिपची आणखी एक घटना समोर आलेली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकरानेच हत्या केली आहे. या प्रकरणी कसारा पोलिसांनी आरोपी प्रियकर रिझवान आणि त्याचा मित्र अर्षद या दोघांना अटक केली आहे. Live-in girlfriend was taken to the forest and killed, accused Rizwan arrested along with accomplice Arshad

पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे रिझवानसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही जवळपास वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे प्रियकर रिझवानने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला आणि अखेर जंगलात नेऊन तिची हत्या केली.



यासाठी रिझवानने त्याचा मित्र अर्षदची मदत घेतली. रिझवानने प्रेयसीला बाहेर फिरण्याच्या बहाण्याने बोलावून कसारा जंगलात नेले आणि धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. कसारा जंगलात अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती 5 जानेवारी रोजी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला तिथून अवघ्या काही मीटर अंतरावर पोलिसांनी मुलीचा फोन जप्त केला. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर तज्ज्ञाच्या मदतीने 5 जानेवारीलाच फोन अनलॉक करण्यात पोलिसांना यश आले. ज्यामुळे तरुणीची ओळख पटली. मुलीची ओळख पटताच पोलिसांनी मुंबई – नाशिक महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत तरुणी दोन अज्ञात व्यक्तींसोबत दुचाकीवरून जाताना दिसली. या प्रकरणाची उकल करण्यासाठी कसारा टीमने एकूण 4 टीम तयार करून रिझवान आणि अर्षद या दोघांना भिवंडी परिसरातून अटक केली आहे.

Live-in girlfriend was taken to the forest and killed, accused Rizwan arrested along with accomplice Arshad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात