आमचं ठरलं असं!म्हणत सोशल मीडियावर दिली नात्याची कबुली
विशेष प्रतिनिधी
पुणे : दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झी मराठीवर येणार सारेगमप लिटलचॅम्प हा कार्यक्रम सगळ्याच रसिकांच्या मनात आजही घर करूनंआहे. या कार्यक्रमांमध्ये गायक अवधूत गुप्ते आणि गायिका देविकी पंडित यांनी परीक्षक म्हणून केलेलं काम . आणि आपल्या लाघवी हसण्याने आणि गोड बोलण्याने सगळ्यांना वेड करणारी निवेदिका पल्लवी जोशी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना भेटलेली ही पंचरत्ने आजही श्रोत्यांच्या गळ्यातला ताईत आहेत.littelechamp fame mugdha and prathamesh engaged
यामध्ये मुग्धा वैशंपायन,प्रथमेश लगाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत , आणि कार्तिकी गायकवाड
या सगळ्यांनी आपल्या गायनाच्या कारकिर्दीत भरपूर यश मिळवलं. आणि यापैकी अनेकांनी आपल्या नवीन जीवनाची सुरुवात देखील केली. दोन वर्षांपूर्वी कार्तिकी गायकवाड हिने लग्न गाठ बांधली. तर रोहित राऊत याने जुईली जोगळेकर हिच्या सोबत लग्न करत नव्या आयुष्याचीं सुरुवात केली.
View this post on Instagram A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)
A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)
आता याच पंचरत्नांपैकी एक जोडी ची सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम सक्रिय आणि लोकप्रिय आहे ती म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत..” शेवटी तुम्हाला वाटत होतं तेच खरंय! “आमचं ठरलं” असं म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
सोबत एक रोमँटिक अंदाजातला फोटो शेअर करत या दोघांनी आपल्या नात्याची गोड बातमीच्या दिली आहे त्यांच्या या नवीन नात्याला संगीत विश्वातून चित्रपट विश्वातून तसाच श्रोत्यांमधूनही भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App