विशेष प्रतिनिधी
नांदगाव : येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना तातडीने आपत्कालीन निधी दिला जातो. मग उत्तर महाराष्ट्र यापासून वंचित का आहे? तातडीने निधी जाहीर करा, अशी मागणी सुहास कांदे यांनी केली. यावरून भुजबळ आणि कांदे यांच्या शाब्दिक चकमक उडाली. दोघांमध्ये या मुद्यावरून भर बैठकीत ‘तू तू मैं मैं’ झाली. Literally flickered Between Bhujbal and Kande on Relif fund
पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे असलेले छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या रागाचा पारा यावेळी चढलेला होता. पुरप्रश्न आणि निधी यावरून जुंपलेली वादावादी दोन्ही नेत्यांच्या अडेलतट्टू भूमिकेवरून तसूभरही पुढे सुरु राहिली नाही. पण, आपत्तीचा सामना करणारी जनता मात्र अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
भुजबळ व कांदे यांच्यात उडाली शाब्दिक चकमक
पश्चिम महाराष्ट्राला निधी देताना झुकते माप का ?
उत्तर महाराष्ट्राची जनता सुद्धा पुराने हैराण आहे
आढावा बैठकीत निधीची घोषणा करा: सुहास कांदे
भुजबळ व कांदे यांच्यात आढावा बैठकीत जुंपली
निधी देण्यावरून भुजबळ,कांदे आमने-सामने
अखेर तू तू मैं मैं होऊन बैठकीवर पाणी फिरले
पूरग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App