विशेष प्रतिनिधी
मुंबई : रोज सकाळी 9 वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकेच सांगतो सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे.Lion never afraid of vultures, Devendra Fadnavis told Sanjay Raut
भाजपसोबत युती तुटल्यानंतर ईडी आपल्याला मुद्दामून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होता. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना देखील एक पत्र पाठवले आहे. आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, मी काय बोलतोय ते देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे, असा इशारा आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.
यावर फडणवीस म्हणाले, ईडी काय करेल हे ईडी सांगेल, ते का करतात हे देखील ईडी सांगेल, मला असे वाटते की, संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जाते नाही. राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणे सोडून दिले पाहिजे.
दिवसभर आपण कसे चर्चेत राहू यासाठी संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करतात, राऊत संपादक असल्याने हेडलाईन कशी द्यायची हे त्यांना चांगले माहित आहे. महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेने काम करेल, आणि पूर्ण शक्तीने आम्ही आमच्या बहुमताने महाराष्ट्रामध्ये सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App