प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसच्या हातातून अमेठी मतदारसंघ निसटू शकतो तर राष्ट्रवादीच्या हातातून बारामती मतदारसंघ का निसटू शकत नाही?, असा परखड सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघात आम्ही असा उमेदवार देऊ की बारामती त्यांच्या हातून कधी निसटली ते त्यांना कळणारही नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला इशारा दिला आहे. Like Amethi, Baramati never went out of hand bawankule
भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पदाधिकारी कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः बारामती मतदारसंघाच्या निरीक्षक आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.
बारामती लोकसभेसाठी भाजपचे गणित काय आहे, तिथे भाजपने कशी तयारी केली आहे, सुप्रिया सुळे यांच्या ताकदीचा, त्यांच्या विरोधात लढणारा उमेदवार भाजपला अजून मिळाला आहे की नाही?, या प्रश्नांची सविस्तर उत्तरे बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, ”आम्ही अशावेळी उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली. आमचा पक्ष वाढवण्यासाठी, आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. पण शेवटी जनतेचा निर्णय आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंना निवडून द्यायचं की भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यायचं हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. पण जर काँग्रेसच्या हातातून अमेठी मतदार संघ निसटू शकतो, तर राष्ट्रवादीच्या हातातून बारामतीही निसटू शकते, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
भाजप हा संस्कृती, मर्यादा पाळणारा पक्ष आहे पण भाजपमधील काही नेतेमंडळीच भाजपच्या संस्कृतीत न बसणारी वक्तव्ये करतात. त्यावेळी तुमच्या आणि इतर राजकीय पक्षातील नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, पक्षावर टीका होऊ शकते पण व्यक्तिगत टीका होऊ नये पण आता ती व्हायला लागली आहे. ती संपली पाहिजे, भाजपच्याही कार्यकर्त्यांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत की व्यक्तीगत टिकाटिपण्णीवर जाऊ नये, धोरणावर बोला. पक्षावर टीका करा पण व्यक्तिगत टीका करू नका, अशा सूचना दिल्या असल्याचे बावनकुळे यांनी सांगितलं.
संजय राऊत यांची सकाळच्या पत्रकार परिषदा घेतात. एखाद्या व्यक्तीचे नाव घेतले की त्यांच्या नावाने थुंकणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. इथपर्यंत आले तरी आमच्या लोकांनी आचारसंहिता पाळायच्या, उद्या जर राऊतांनी बोलणं बंद केले, तर नितेश राणेही बंद करतील. त्यामुळे माझी संजय राऊतांना विनंती आहे की, त्यांनी आता यातून बाहेर पडावे. तुम्ही सकाळच्या परिषदा बंद केल्या तर नितेश राणेंनाही आम्ही बोलणे बंद करायला सांगू असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App