संजय राऊत विधिमंडळला म्हणाले, “चोरमंडळ”; राऊतांविरोधात हक्कभंगाचे पत्र; राष्ट्रवादीसह सर्व विरोधक बचावात्मक!!

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांना विधिमंडळात बचावात्मक पावित्र्यात जायला भाग पाडले. संजय राऊत विधिमंडळाला “चोरमंडळ” असे म्हणाले. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंग आणण्याचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात बाकी सर्व विरोधी नेत्यांना बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. Letter of infringement against Raut

कांद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिंदे – फडणवीस सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्रमण करत असताना अचानक संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या पत्रकार परिषदेत विधिमंडळाला “चोरमंडळ” म्हणल्याने सत्ताधाऱ्यांना जबरदस्त जोर चढला आणि त्यामुळे त्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणला. याचा परिणाम विरोधकांना वेगळ्या प्रकारे भोगावा लागून अखेर बचावात्मक पवित्र्यात जाणे भाग पडले.



खासदार संजय राऊत रोजच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करत असतानाच विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. शिंदे गटाने संजय राऊत यांचे शिवसेनेचे संसदीय गटनेतेपद काढले आहे त्यावर संतप्त होऊन शिंदे गट म्हणजे बनावट शिवसेना आहे त्यांनी आमची पदे काढली म्हणून काय फरक पडत नाही आम्ही अशी पदे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर ओवाळून टाकतो शिंदे गटाची शिवसेना विधिमंडळ म्हणजे चोरमंडळ आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजप आमदार मात्र आक्रमक झाले. यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना ताबडतोब राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासंदर्भात पत्र दिले.

या मुद्द्यावर अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात यांनी कोणालाही विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार नाही अशा आशयाची भाषणे केली त्याचवेळी दोषी असलेल्या नक्की शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. पण बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष सदस्यांना सत्ताधारी सदस्य देशद्रोही म्हणतात, याकडेही लक्ष वेधले. दरम्यानच्या काळात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले विधानसभेत भाडखाऊ शब्द वापरते झाले. त्यावरूनही गदारोळ झाला. अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनिटे तहकूब केले.

Letter of infringement against Raut

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात