Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला

Legislature Session

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Legislature Session   राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली. त्याचे तीव्र पडसाद शेवटच्या दिवशी सभागृहात उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला.Legislature Session

दरम्यान, शुक्रवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 रोजी नागपुरात भरेल. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत, तर सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.Legislature Session



आव्हाड – पडळकर समर्थकांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले अभ्यंगत नितीन देशमुख तसेच गोपिचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाला प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एकप्रकारे सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान केला आहे. त्यामुळे या संदर्भातील कारवाईसाठी हे प्रकरण मी विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे.

अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले, अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा असताना माझ्यासह आपल्या सर्वांच्या मनात वेदना आहेत. आपण अधिवेशन संपवतोय, पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडल्या आहेत, त्यातून नेमका काय संदेश आपण घेऊन जाणार आहोत? आणि लोकांना काय संदेश आपण देत आहोत? ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही. कुठल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही. ही विधानसभा महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांच्या मालकीची आहे. अशा विधानसभेत समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण या ठिकाणी विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथ्याबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असे वाटते की, आपण सर्वांनी याविषयी चिंतन करण्याची गरज आहे. मी आपले आभार मानेन की, आपण हे प्रकरण गांभिर्याने घेतले. दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते की नव्हते हे सोडले तर त्या दोघांनीही याठिकाणी खेद व्यक्त केला. पण मला असे वाटते की, शब्दांतून निघणारे विष हे एखाद्या नागाच्या विषाहूनही जास्त विषारी असते. त्यामुळे याठिकाणी चर्चा, चर्चेचा स्तर या प्रकरणी कटूता निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे.

संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन, सातत्यपूर्ण संवाद या त्रिसुत्रीची गरज -फडणवीस

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनेकदा प्रसंग येतात. शेवटी आपण माणूस आहोत. राग अनावर होतो. पण त्यानंतरही आपल्या चर्चेचा स्थायीभाव हा भाव मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे. आपण पाहिले कुणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कुणी अजून काही बोलत आहे, कुणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांविरोधातच अध्यक्ष मॅनेज आहेत असे बोलतंय. मला असे वाटते की, या सभागृहाने एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे. या सभागृहात 288 सदस्य आहेत. नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत. आपण 45 च्या ऐवजी 200 लक्षवेधी करता. त्यानंतरही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो. ती भाषा काही योग्य नाही. त्रिभाषा सूत्रावरही बरीच चर्चा झाली. आता कुठली भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेन. पण मला असे वाटते की, आपल्याला निवडून आल्यानंतर एक त्रिसुत्री या प्रकरणी ठरवावी लागेल. ती म्हणजे, संसदीय परंपरांचे पालन, संसदीय भाषेचे पालन व सातत्यपूर्ण संवाद. ही त्रिसुत्री पाळली तर याठिकाणी निश्चितपणे आपण त्यातून एक चांगला संदेश देऊ शकतो.

ओळखपत्राशिवाय कुणालाही आत प्रवेश देऊ नका – फडणवीस

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, काल या ठिकाणी जी हाणामारी झाली. खरे म्हणजे कुणीही कुणाहीसोबत येत आहे या प्रकरणी काही ना काही शिस्त असली पाहिजे. आपण पाहिले तर ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत. नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर 8 गुन्हे आहेत. यांची पार्श्वभूमी एवढी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अशी मंडळी येथे येऊन मारामारी करतात. हे योग्य नाही. त्यामुळे सदस्यांनी यासंबंधी लक्ष आघेतले पाहिजे. अध्यक्षांनी या प्रकरणी घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आपण सदासर्वकाळ लोकांसाठी सभागृह बंद करू शकत नाही. काही लोकांनी चूक केली नाही म्हणून आपण तसे करू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की, आपण या सभागृहात खूप चांगले बदल केले आहेत. सभागृहाचा चेहरा आपण बदलला आहे. आता या सभागृहात पुढचे अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे. यादरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यंगत येऊ द्या विना बिल्ला इथे दिसणार नाही. कारण, असेही माझ्या लक्षात आले आहे की, अनेक लोक कुणाच्याही परवागीशिवाय आतमध्ये येतात. ते येतात कसे? 2-4 लोक आले तर आले त्याने मला फरक पडत नाही. त्याची चिंता वाटत नाही. पण त्यातील एखाद्याने इथे येऊन अतिरेकी घटना केली तर तर उद्याला त्याची जबाबदारी कोण घेईन? म्हणून येथील सुरक्षा व्यवस्थेत बदल करून आत येणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्रासोबतच प्रवेश दिला पाहिजे. व्यक्तीच्या गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले पाहिजे. हे झाल्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असे ते म्हणाले.

एका आमदाराच्या चुकीमुळे सर्वांची बदनामी – फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण अनेक गोष्टींवर खेद व्यक्त केला आहे. पण ते करतील की नाही हे मला माहिती नाही. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटले, हस्तक म्हटले. त्यांच्याकडून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. याठिकाणी मी जे काही बोललो ते कोणत्याही एका पक्षाला लागू नाही. ते दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. कारण, आपण जसे वैयक्तिक आहोत, तशी एक संस्था म्हणूनही आपली एक इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो, तेव्हा सगळ्या आमदारांविषयीचे मत समाज तयार करतो असतो. तेव्हा तो सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षांचा आहे हे पाहत नाही. सर्वांबद्दल हे मत तयार होतो की, आपण कुठेही तरी सत्तेचा अपव्यवहार, अपव्यय करतोय. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Legislature Session Concludes; Winter Session December; CM Denies Honeytrap

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात