Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना कायदेशीर नोटीस; 7 दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईचा इशारा

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Laxman Hake राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली असून, हाके यांनी सात दिवसांत अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा नितीन यादव यांनी दिला आहे.Laxman Hake



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात वेळोवेळी जाणुनबुजुन बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात कायदेतज्ज्ञ ॲड. शंतनु माळशिकारे यांच्या वतीने नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना आज नोटीस बजावली. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांची लेखी माफी न मागितल्यास लक्ष्मण हाके यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे.

Legal notice to OBC leader Laxman Hake; Apologize within 7 days, otherwise action will be taken

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात