Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर खुलासा; ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप

Laxman Hake

विशेष प्रतिनिधी

 

वृत्तसंस्था  : Laxman Hake : राज्यातील ओबीसी आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांचा कथित दारूच्या नशेतला व्हिडिओ आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात टीकात्मक वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी एका युवकाकडे पैशाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. या संभाषणात सामाजिक कार्यासाठी पेट्रोल खर्च म्हणून पैसे दिल्याचा उल्लेखही आहे. या व्हायरल ऑडिओवर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण देत आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

हाकेंनी सांगितले की, “मला दररोज 15 ते 20 धमकीचे फोन येतात. माझ्याविरोधात नियोजनबद्ध कट रचून अशा प्रकारे फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले जाते. मी स्वतःहून कोणाला पैसे मागितले नाहीत. ज्याने पैसे देण्याची ऑफर दिली, त्याचा हेतू काय होता, हे तपासले पाहिजे. मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. पण, कितीही बदनामी केली तरी लक्ष्मण हाके घाबरणार नाही. मात्र, या सगळ्यात ओबीसी चळवळीला बदनाम होता कामा नये.” त्यांनी पुढे म्हटले की, “मी धमक्यांना घाबरत नाही. मला बदनाम करून ओबीसी चळवळ थांबवण्याचा हा प्रयत्न आहे.”



बीडच्या ओबीसी मेळाव्यात हाकेंना निमंत्रण नाही; नेत्यांमध्ये फूट?

लक्ष्मण हाके यांनी मराठवाड्यात ओबीसी प्रश्नावर रान पेटवले असताना, बीड येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात त्यांना निमंत्रण न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मेळाव्यात हाकेंना डावलल्याने ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांत हाके यांना मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ते ओबीसी चळवळीचे प्रमुख नेते म्हणून उदयास येत होते. मात्र, या मेळाव्यात त्यांना निमंत्रण न मिळाल्याने ओबीसी नेत्यांमधील दरी समोर येत आहे. यापूर्वीही ओबीसी प्रश्नावर नेत्यांमध्ये परस्परविरोधी वक्तव्ये समोर आली होती, ज्यामुळे ही फूट अधिक स्पष्ट होत आहे.

Laxman Hake’s viral audio clip exposed; Allegation of plot to defame OBC movement

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात