विशेष प्रतिनिधी
पुणे : Laxman Hake मनोज जरांगे यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केल्या असून जरांगे पाटलांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. तसेच मराठा आंदोलक देखील मुंबईतून माघारी फिरत आहेत. अशात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता हल्लाबोल सुरू केला असून पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.Laxman Hake
पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासह पवार कुटुंबावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, शरद पवार एकीकडे मंडल यात्रा काढतात आणि दुसरीकडे मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात. या पवार फॅमिलीने, या पवार ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपवले आहे आणि त्यामुळे त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत.Laxman Hake
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते. एकीकडे न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर आणि एक वेळ दिली की यांना लवकर मुंबईच्या बाहेर काढा. म्हणजे एकीकडे न्यायालयाच्या निर्णयासमोर हतबल होते आणि दुसरीकडे यांना मुंबईच्या बाहेर कसे काढायचे यासाठी हतबल होते. पण हे जे आंदोलन उभे केले आणि बेकायदा मागण्यांना पाठिंबा द्यायचे काम केले शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी.Laxman Hake
रोहित पवारांचे आयटी सेल हे मनोज जरांगेंचे आंदोलन चालवत होता
ओबीसी आरक्षण विरोधी आंदोलनाला अजित पवारांचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दिला. कोणी गाड्या पुरवल्या, कोणती माणसे होती, कोणी पत्रकार परिषदा घेतल्या आणि या सगळ्या मागे पवार फॅमिली आहे. रोहित पवारांचे आयटी सेल हे मनोज जरांगेंचे आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहिती आहे. कालपासून मी बोलत आहे की हा जीआर बेकायदा का आहे, त्याचे कारण असे आहे की शासनाच्या आदेशात असे लिहिले आहे की, मराठा समाजास जात प्रमाणपत्र प्रक्रियेत सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. म्हणजे या जीआरचा उद्देश मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा हा आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
मनोज जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवर बहिष्कार टाकणार
लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना ज्या ज्या नेत्यांनी मदत केली, त्या सगळ्या नेत्यांवर बहिष्कार टाकणार. ओबीसींच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांची नावे निश्चित करणार आणि मनोज जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवर बहिष्कार टाकायला सांगणार. ज्या बारामतीमधून मनोज जरांगे पुढे गेलेत, त्याच बारामतीत आम्ही जाऊन आंदोलन करणार. तसेच न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आता ओबीसी बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहनही लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
राज्य सरकारने परस्पर निर्णय घेतलाच कसा?
मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरबाबत ओबीसी समाजात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून कोर्टात जीआरबाबत हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. जीआर काढण्याचा अधिकार मराठा आरक्षण उपसमितीला नाही शिवाय मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला असताना राज्य सरकारने परस्पर निर्णय घेतलाच कसा? एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, म्हणता आणि दुसरीकडे मराठा समाजाला बॅकडोअर एंट्री कशी काय देता? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.
बारामतीत 5 तारखेपासून ओबीसींचे आंदोलन
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करणारा आणि संविधान विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर हाके यांनी 5 सप्टेंबरपासून बारामतीत ओबीसींच्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
ओबीसीच्या हितांना कुठेही धक्का लागलेला नाही- बबनराव तायवाडे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, सरकारकडून काल काढण्यात आलेल्या जीआरमुळे ओबीसीच्या हितांना कुठेही धक्का लागलेला नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे यांची मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. आत्ताच्या प्रचलित पद्धतीतूनच आवश्यक दस्तावेज असलेल्या किंवा वंशावळच्या नातेवाईकाचे प्रतिज्ञा पत्र आणणाऱ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे सर्व आधीच्या नियमानुसारच होत असल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App