Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची जहरी टीका- अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता, कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते?

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Laxman Hake राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवारांनीच जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका त्यांनी शुक्रवारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.Laxman Hake

महाराष्ट्र हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हे राज्य अठरापगड जमाती आणि भटक्या-विमुक्तांचे आहे, हे दाखवून द्या, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे. ते म्हणाले, सरकार 10 टक्के मराठा समाजाला घाबरत असेल तर आपल्याकडे 50 ते 60 टक्के समाज आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे शोषण पुरे झाले. इथले सरकार, आमदार आणि खासदारांना आपण पळता भुई थोडी करू. रविवारी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.Laxman Hake



अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता

अजित पवारांवर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले, अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे शोभत नाही त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन नका. अजित पवार तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगैरे कळणार नाही, तुमची ती कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते?, अशा शब्दात हाके यांनी टीका केली आहे.

अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर

पुढे बोलताना लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर आपण वरिष्ठ सभागृहात पाठवला. मिटकरी यांनी त्या सभागृहाचा अपमान केला आहे. अमोल मिटकरी तुम्ही कितीवेळा तोंडावर पडणार आहात? हा अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आणि याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केले आहे. यूपीएससीचा लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का? अमोल मिटकरी हा कोणत्यातरी समाजाला टार्गेट करतो, हा नकलाकार आहे. अजितदादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळं करायला लावणार. तुम्ही या पाळलेल्या श्वानाला आवरा, असे हाके यांनी म्हटले आहे.

सत्तेत कोणाला बसवायचे ते ठरवू

गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, गोपीचंद हा माझा सहकारी असून आठरापगड जातीचा आवाज आहे. गोपीचंद यांना मंत्रिपद मिळायला हवे. माझा सहकारी बोलायला लागला की आम्ही गावगाड्यातील ओबीसींचा आवाज बनू. आमदार, खासदार आपण बनवू आणि सत्तेत कोणाला बसवायचे ते ठरवू. कुठल्यातरी काहीतरी गोष्टीसाठी आपला आवाज दाबू नका व्यक्त व्हा, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

छगन भुजबळ हे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारे नाहीत

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, कुठल्याही सरकारला किंवा शासनाला एखाद्या व्यक्तीचे आडनाव लावू नये, असे आदेश देण्याचा अधिकार नाही. आडनाव झाकून जात व्यवस्था नष्ट होणार असेल तर तसे होत नाही. बाबासाहेबांनी सांगितले होते जात कधीच जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आडनाव लपवून जात लपत नसते, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. छगन भुजबळ हे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे नाहीत. भुजबळ साहेब ताठ मानेने उभे राहतील तेव्हा महाराष्ट्राचे चित्र बदललेले असेल. आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जबाबदारीची जाणीव करून द्या.

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात